वैशिष्ट्ये

योजना

गावामध्ये राबवलेल्या योजना व महायोजानांची माहिती

गावाविषयी

गावाची लोकसंख्या, भौगोलिक स्थान, ऐतिहासिक वारसा इ.बाबत माहिती

शिक्षण

शाळा-महाविद्यालयांची माहिती व त्यांद्वारे नागरिकांना मिळणारे अपडेट्स.

आरोग्य

आरोग्य संस्थांकडून नागरिकांना मिळणारी माहिती, लसीकरण, तपासणीबाबत माहिती

सदस्य

ग्रामपंचायत सदस्य बॉडी: सरपंच, उपसरपंच, इतर सदस्य ग्रामसेवक, कृषिसहाय्यक, तलाठी, पोलीस पाटील, पोस्ट-मास्तर

योजना

गावामध्ये राबवलेल्या योजना व महायोजानांची माहिती

गावाविषयी

गावाची लोकसंख्या, भौगोलिक स्थान एतिहासिक वारसा इ.बाबत माहिती

डिजिटल ग्रामपंचायत

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गाव आणि नगरे डिजिटल सुविधांनी जोडली गेल्याने त्यांच्या विकासात भर पडणार आहे.

गावकनेक्ट देते आहे, तुमच्या गाव/ नगरासाठी स्वतःच्या नावाने ॲप प्रणाली. म्हणजे तुमचा नागरिक प्ले स्टोअर वरून केव्हाही डाऊनलोड करू शकेल अथवा अपडेट करू शकेल.

तुमच्या स्वतःच्या ॲपद्वारे जोडा, प्रत्येक नागरिक तुमच्या नागरी संस्थांशी आणि त्यांना अनुभव द्या, सर्वोत्तम व्यवस्थापन आणि पारदर्शक कारभाराचा.

आम्ही खास तुमच्यासाठी बनविली आहे, ही सुविधा. सोबतच आम्ही काळजी घेतो की हे ॲप वापरणाऱ्या प्रत्येक नागरिकास फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीजद्वारे रोज शासन, कृषि, अर्थविषयक घडामोडी समजतील आणि तुमच्या कार्यप्रणालीच्या प्रत्येक विभागाशी संपर्क करता येईल.

सर्व प्रणाली सातत्याने अपडेट करणे, व्यवस्थापन खर्च आणि तांत्रिक खर्च आता विसरा आणि स्वतःच्या गाव/ नगरासाठी वापरा, ही सर्वोत्तम ॲप सेवा

गावकनेक्ट

फॉक्सबेरी २५ लक्षहून अधिक शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना विविध वृत्त, विश्लेषण आणि माहिती सेवा पुरविते. गावकनेक्ट ॲपमधून ॲग्रोवनचा स्वतंत्र विभाग उपलब्ध करून दिला आहे, जो ॲप वापरणारा प्रत्येक नागरिक सातत्याने वापरू शकेल.

फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीज माहिती सेवा: प्रत्येक विभागात माहिती रोज अपडेट होते

  • मार्केट रिपोर्ट – ३० हून अधिक पिकांचे मासिक टॉप ५ बाजारपेठ अहवाल आणि तेजी मंदी माहिती
  • चालू घडामोडी - शासकीय योजना, कृषि-अर्थ विश्लेषण , यशोगाथा, तंत्रज्ञान माहिती
  • कृषितज्ज्ञ सल्ला- महाराष्ट्रातील कृषिविद्यापीठे आणी संशोधन संस्थांद्वारे देण्यात येणारा हंगामी पीकसल्ला
  • जाहिराती – कृषि व्यवसायाशी संबंधित उत्पादनांची माहिती
  • *माहिती/ लेख/ रिपोर्ट शेअर करता येतात

ॲप स्क्रीन

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गाव आणि शहर डिजिटल सुविधांनी जोडली गेल्याने त्यांच्या विकासात भर पडणार आहे.

अभिप्राय

3,156

सौ. स्मिता भोसले

(सरपंच)

निरंतर विकासाची भूमिका घेतल्यामुळे माण गावाचा लौकिक हा देशपातळीवर गेला आहे. आता माण गावाच्या नावाने प्ले स्टोअर वर असणाऱ्या गावकनेक्ट ॲपच्या वापरामुळे आमच्या नागरिकांना बऱ्याच उत्तम सुविधा मिळू शकतील. खऱ्या अर्थाने गाव आणि गावकरी या स्मार्ट प्रणालीद्वारे जोडले जाणार आहेत. माण ग्रामपंचायत गावकनेक्ट ॲप सुविधेद्वारे राज्यात पहिली अशी वैशिष्ट्यपूर्ण ग्रामपंचायत ठरणार आहे, त्यामुळे अशा गावाची सरपंच म्हणून मला नक्कीच अभिमान वाटतो आहे. बदलत्या काळानुसार, नागरिकांना आणि नागरी व प्रशासकीय संस्थांना अत्याधुनिक गावकनेक्ट प्रणालीद्वारे जोडल्याने पारदर्शी कारभारासोबत गावाच्या विकासाचा वेग वाढणार आहे. मी जेव्हा इतर सरपंचांना माझ्या गावाचे ॲप दाखवते तेव्हा त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल दिसणारा आदर आणि आश्चर्य लपत नाही. डिजिटल महाराष्ट्रात माण गाव नेतृत्व करते आहे, यापेक्षा अभिमानाची गोष्ट दुसरी काय असू शकेल..

श्री. संदीप साठे

(उपसरपंच)

माण गावास विविध पुरस्कार मिळाल्याने, आमच्यावरील जबाबदारी वाढली होती. नागरिकांसाठी सुविधाजनक आणि नाविन्यपूर्ण योग्य प्रणाली बनविण्यावर आम्ही विचार करत होतो. गावकनेक्टबाबत माहिती मिळाली आणि आम्ही अक्षरशः या प्रणालीच्या प्रेमात पडलो. आता आमचे शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत आणि नागरिक हे सर्व प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करतील. माझे गाव खऱ्या अर्थाने डिजिटल आणि स्मार्ट झाले, याबाबत खूपच समाधान वाटते आहे.

श्री. बी. आर. पाटील

(ग्रामसेवक)

बऱ्याचदा काम करत असताना नागरिकांना डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून अधिक उत्तम प्रकारे मदत कशी करता येईल, हा विचार मनात येत असे. गावकनेक्टच्या सुविधेमुळे आता ॲप आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही माध्यमातून नागरिकांना उत्कृष्ट सेवा पुरविता येणार आहे. विशेष म्हणजे यातून शासनाच्या योजना, कृषि, अर्थविषयक घडामोडी आणि अतिशय उपयुक्त माहिती रोज प्राप्त झाल्याने गावकनेक्ट ॲप प्रणाली फारच आकर्षक वाटते. मलाही काम करताना लेखा जोखा राहण्यासाठी मदत होऊन नागरिकांना उत्तम सुविधा पुरविता येते आहे.

श्री. पाडुरंग ओझरकर

(उपसभापती पं.स. मुळशी)

माण गावाच्या विकासामध्ये आधुनिक दृष्टी आणि नाविन्याचा ध्यास कामास आला आहे. गावकनेक्ट ॲप सुविधेबाबत माहिती मिळाली तेव्हा मी विचार केला की, मी खरे तर असेच काहीतरी शोधत होतो. यामुळे गावाचे नागरिक, संस्था, प्रशासन इतक्या सुंदररीत्या एकमेकांशी जोडल्या गेल्यात की, आता आमच्या गावातील परदेशी स्थायिक नागरिकदेखील गावात घडणाऱ्या घडामोडींबाबत रोज अपडेट मिळवू शकतात. डिजिटल इंडियाची गंगा माण गावाच्या अंगणातून वाहते आहे, याचे खूप समाधान वाटते.